Premium|Punch macaque monkey doll mother : आई तुला शोधू कुठं?

Animal emotions and maternal bonding : आईने नाकारलेल्या आणि टोळीने झिडकारलेल्या 'पंच' नावाच्या माकडाच्या पिलाची हृदयस्पर्शी कथा सध्या जगभर चर्चेत आहे. एका खेळण्यामध्ये आईची माया शोधणाऱ्या या जिवासाठी हजारो हात मदतीला सरसावले असून मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडत आहे.
Punch macaque monkey doll mother

Punch macaque monkey doll mother

esakal

Updated on

गोपाळ कुलकर्णी

जगभरातील अनेक लक्ष्मीपुत्रांनी पंचला दत्तक घेण्याची तयारी दर्शविली आहे. काहीजण यासाठी हजारो डॉलर मोजायला तयार आहेत. ‘पंच तू एकाकी नाहीस...’ अशी साद समाज माध्यमांवरून घालणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. अनेक प्राणीप्रेमींनी तर चक्क प्राणिसंग्रहालयाशी संवाद साधत पंचची स्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला. माणसाच्या जगाची ही प्रेमळ साद पंचला कळली असेल का?

अमेरिकेतील प्रसिद्ध संशोधक हॅरी हार्लो यांनी १९५८मध्ये घडवून आणलेल्या प्रसिद्ध ‘मंकी एक्सपेरिमेंट’मधून काही आश्चर्यजनक बाबी उघड झाल्या होत्या. केवळ स्पर्शाच्या माध्यमातूनच आई आणि मूल यांच्यात पहिला संवाद होतो. ही सगळी प्रक्रिया गर्भावस्थेमधूनच सुरू होते, असा दावा त्यांनी संशोधनाअंती केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष पृथ्वीतलावर पाऊल ठेवल्यानंतर मात्र बाळाचा पहिला आधार आणि ओळख ही त्याची आईच असते. यामुळे मानसशास्त्रज्ञ जॉन बॉल्बी यांच्या परस्परांवरील अवलंबित्व आणि भावनिक बंधाला बळ देणाऱ्या सिद्धांताला पुष्टी मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com