Premium|Backstage Career Opportunities : पडद्यामागील कलाकारांसाठी डिजिटल युगात वाढती मागणी

Growing Demand for Technical Artists : डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे रंगभूषा, वेशभूषा, सेट डिझाइन, प्रकाशयोजना आणि ध्वनी व्यवस्थापन यांसारख्या पडद्यामागील कौशल्यांना मोठी मागणी निर्माण झाली असून करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
Growing Demand for Technical Artists

Growing Demand for Technical Artists

esakal

Updated on

अजित साबळे

डिजिटल माध्यमांमुळे ‘लुक’ आणि ‘व्हिज्युअल आयडेंटिटी’ या गोष्टींना पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे, त्यामुळे स्वतंत्ररित्या फ्रीलान्सर म्हणून काम करण्याच्याही अनेक संधी आज उपलब्ध आहेत. सौंदर्यदृष्टी, रंगसंगतीची जाण आणि व्यक्तिरेखा समजून घेण्याची क्षमता असेल, तर या पडद्यामागच्या क्षेत्रात दीर्घकालीन आणि सर्जनशील करिअर घडवता येऊ शकतं.

नाटक किंवा सिनेमा म्हटल्यावर सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ती नटमंडळी. त्यापाठोपाठ डोळ्यासमोर येतात जास्तीत जास्त लेखक आणि दिग्दर्शक. रंगमंचावर किंवा पडद्यावरचा कलाकार प्रेक्षकांसाठी नाटकाचा/सिनेमाचा चेहरा असतो. मात्र जी नाटकं किंवा सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात, ते केवळ आणि केवळ नटांमुळे, असं म्हणता येणार नाही. त्यांच्याइतकीच पडद्यामागच्या इतर कलाकारांचीही मेहनत असते. नाटकातल्या किंवा सिनेमातल्या कथाभागाचं जे दृकश्राव्य विश्‍व आपल्यासमोर उभं असतं, त्या विश्‍वाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्याला नट, त्यांचा अभिनय या गोष्टी उठावदार वाटतात. परंतु हे विश्‍व उभारण्यामागं अनेक तांत्रिक बाजू असतात, त्या सांभाळणाऱ्या सहकाऱ्यांचं योगदान असतं. नाटकाबाबतीत बोलायचं झाल्यास प्रत्यक्षात एखादा नाट्यप्रयोग सादर होण्यामागं पडद्याआड अनेक तंत्राद्यांची मेहनत असते. नेपथ्य रचना (सेट डिझाईन), प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, ध्वनी व्यवस्था, मंचवस्तू, नाटकाचं व्यवस्थापन अशा अनेक विभागांच्या एकत्रित प्रयत्नांतून एक नाट्यकलाकृती पूर्णत्वाला येते.

आजच्या डिजिटल आणि दृकश्राव्य माध्यमप्रधान काळात अशा पडद्यामागील गोष्टींचं कसब अंगी असलेल्या कलाकारांची जोरदार मागणी आहे. या क्षेत्रांमध्ये करिअरच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. पुण्यातलं एफटीआयआय, नवी दिल्लीतलं राष्ट्रीय नाट्य विद्यालय, कोलकात्यातलं एसआरएफटीआय यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षण संस्थांमध्ये स्टेज-क्राफ्ट, सेट डिझाईन, साउंड इंजिनिअरिंग, आर्ट डायरेक्शन, कॉस्च्युम डिझाईन इत्यादींचं व्यावसायिक प्रशिक्षणदेखील दिलं जातं.

काही वर्षांपूर्वी ‘नाटक म्हणजे छंद’ अशी धारणा होती, ती आता झपाट्यानं बदलताना दिसते आहे. रंगभूमीवरील तांत्रिक कौशल्यं आज चित्रपट, वेब सीरिज, जाहिरात, इव्हेंट्स, सोशल मीडिया कन्टेंट, कॉर्पोरेट शो, सांस्कृतिक कार्यक्रम, शॉर्ट फिल्म्स, युट्यूब चॅनेल्स अशा विविध क्षेत्रांमध्ये वापरली जात आहेत, त्यामुळे अभिनय न करतादेखील नाट्यक्षेत्राशी जोडलेलं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करिअर घडवणं आज पूर्णपणे शक्य झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com