डॉ. प्रमोद जोग
‘समतोल आहार’ म्हटलं, की शाळेतल्या पुस्तकातली चित्रं आठवायला लागतात. त्या चित्रांत, गहू-तांदूळ, डाळी, उसळी, गूळ, दूध, लोणी, अंडी, मासे ही मंडळी एकाच ताटात हजेरी लावून बसलेली दिसायची. त्या पदार्थांचं महत्त्व तेव्हा परीक्षेपुरतंच वाटायचं. ६ ते १२ वर्षे वयातील मुलांच्या आहाराच्या दृष्टीनं त्यांचं महत्त्व पाहू या.
वाढत्या वयातील मुलांच्या आवडी-निवडी सांभाळून, त्यांना पौष्टिक पण चविष्ट आहार देणं म्हणजे आयांसाठी तारेवरची कसरतच. आजच्या आधुनिक मातेसाठी तर ते अधिकच मोठं आव्हान आहे. पण थोडा विचार, नियोजन केल्यास सर्व आघाड्या लीलया सांभाळणारी आजची आई हे आव्हानही सहज पेलू शकेल.