
केवल जीवनतारे
२४ तासांपैकी १८ तास हातात स्टेथस्कोप, कामाची अनिश्चित वेळ, अस्थिर दिनचर्या यामुळे डॉक्टरांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. परंतु, रुग्णसेवा करतानाच अभिनयाच्या छंदासाठी वेळ काढून स्वसमाधानासोबतच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे डॉ. अभिजित रमेश अंभईकर साऱ्या नागपूरमध्ये परिचित आहेत.