

Bamboo Craft India
esakal
वर्षा गजेंद्रगडकर
ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जवळपास साठ वेगवेगळे आदिवासी समुदाय राहतात. आजपर्यंत त्यांनी जशी आपली वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली जपली आहे, तशी बांबू हस्तकलेची परंपराही राखली आहे. लागवडीसारख्या इतर कामांमधून उसंत मिळाली, की साधारणतः जुलै ते ऑक्टोबर या काळात बांबूच्या वस्तू तयार केल्या जातात.
भारतीय हस्तकला या केवळ उपजीविकेचं साधन कधीच नव्हत्या. कला इथल्या ग्रामीण आणि आदिवासी समूहांची जीवनशैली राहिली आहे. भारतीय कलाकार आपल्या निर्मितीमध्ये पिढ्यान्पिढ्या जसा सांस्कृतिक अस्मितेचा चिवट आणि देखणा धागा विणत आले आहेत, तशा व्यक्तिगत आणि सामूहिक जगण्यातल्या कितीतरी लोभस कथाही आपल्या कलेमध्ये ते सहजतेनं अंतर्भूत करत आले आहेत. त्यामुळेच भारतीय हस्तकला शतकानुशतकं वाढत-विस्तारत राहिल्या, आणि स्थानिक गंध कायम राखत त्या बदलत्या काळाशीही जुळवून घेत राहिल्या.