Barley Recipe : चांगलं, सकस, चवदार आणि पौष्टिक खायचं आहे तर बार्लीच्या या रेसिपी कराच..!

Indian authentic healthy millet Recipe: याचे इंग्रजी नाव बार्ली. जव म्हणजे ओट नाही आणि जवसही नाही. जव ही भारतात प्राचीन आणि देशात आजही उगवणारे एक भरड धान्य आहे..
barley indian recipe
barley indian recipeEsakal
Updated on

Food Point: अनघा देसाई

बार्लीचा पुलिओगरे

वाढप :

२-३ व्यक्तींसाठी

साहित्य :

एक कप बार्ली, मीठ चवीप्रमाणे, २ मोठे चमचे चिंचेचा घट्ट कोळ, १ चमचा किंवा आवडीप्रमाणे गूळ, २-३ मोठे चमचे तळलेले शेंगदाणे.

मसाल्‍यासाठी : एक चमचा तेल, २ चमचे उडीद डाळ, १ मोठा चमचा चणा डाळ, १ मोठा चमचा धने, १ चमचा जिरे, एक अष्टमांश चमचा मेथी, ६ ते ८ काळे मिरे, ३ लाल सुक्या मिरच्या, १ मोठा चमचा तीळ, २ ते ३ मोठे चमचे सुके खोबरे.

फोडणीसाठी : दोन मोठे चमचे तेल, अर्धा चमचा राई, पाव चमचा हिंग, १ डहाळी कढीपत्ता, ४ ते ५ काळी मिरीचे दाणे, १ चमचा किसलेले आले.

कृती :

सर्वप्रथम २ कप पाण्यात बार्ली ४ तास भिजवून नंतर मीठ घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावी. नंतर एक चमचा तेल गरम करून मसाल्याचे साहित्य दिलेल्या क्रमाने घालून सुके खोबरे भाजले जाईपर्यंत परतावे व बारीक वाटून घ्यावे. नंतर २ मोठे चमचे तेल गरम करून फोडणीच्या सर्व साहित्याची फोडणी तयार करावी. त्यात चिंचेचा कोळ परतावा. तो थोडा सुकल्यानंतर त्यात तयार मसाला तेल सुटेपर्यंत परतावा. त्यात शिजलेली बार्ली घालून चांगले ढवळून मसाला आणि बार्ली मिसळावी. एक वाफ काढावी व वरून तळलेले शेंगदाणे घालावेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com