Premium|Behavioral Economics and Saving : बचत करणं अवघड का वाटतं?

Psychology Behind Saving Money : बचत न होण्यामागे केवळ उत्पन्न किंवा इच्छाशक्तीचा अभाव नसून मानवी मानसशास्त्रही महत्त्वाची भूमिका बजावते. वर्तनात्मक अर्थशास्त्रातून बचतीच्या सवयी आणि आर्थिक निर्णय समजून घेता येतात.
Behavioral Economics and Saving

Behavioral Economics and Saving

esakal

Updated on

डॉ. अमेय खरे

बचत न होणं हे केवळ इच्छाशक्तीच्या अभावाचं लक्षण नाही, तो आपल्या मनाच्या स्वाभाविक रचनेचा परिणाम आहे. हे समजलं की मनाला अनुकूल ठरणारी व्यवस्था तयार करणं अधिक परिणामकारक ठरतं. अर्थशास्त्र आपल्याला आकडे शिकवतं, पण मानसशास्त्र आपल्याला हे आकडे आपण प्रत्यक्षात का पाळत नाही, हे शिकवतं. या दोन्हींची एकत्रित समज, हीच खऱ्या अर्थानं ‘अर्थ’जाण आहे.

बचत करणं हे केवळ आकड्यांचं गणित नसतं, ते आपल्या मनाचंही गणित असतं. आणि हे मन अनेकदा अर्थशास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध वागत असतं. एक उदाहरण पाहू या. निखिलला माहितीये, की त्यानं दर महिन्याला पाच हजार रुपये बचत करायला हवी. त्यानं अनेक वेळा तसं ठरवलंयसुद्धा. पण महिन्याच्या शेवटी बचत करायची वेळ येते, तेव्हा हातात पैसेच उरलेले नसतात. निखिल बेजबाबदार नाही, उलट तो हुशार आणि शिस्तप्रिय आहे. मग बचत करणं त्याला इतकं अवघड का वाटतं? या प्रश्नाचं उत्तर आकड्यांत नाही, ते त्याच्या मानसिकतेत आहे.

मागील सगळ्या लेखांमध्ये आपण महागाई, बजेट, बचत, गुंतवणूक, कर्ज, जीडीपी आणि विमा यांसारख्या संकल्पना पाहिल्या. या सर्व चर्चांमध्ये एक गृहीतक होतं, ते म्हणजे माणूस तर्कशुद्ध विचार करतो आणि आर्थिक नियोजन केवळ योग्य माहिती आणि योग्य आकडे असल्यास सहज शक्य होतं. पण वास्तव अधिक गुंतागुंतीचं आहे. अर्थशास्त्राची एक शाखा या गुंतागुंतीचा अभ्यास करते, तिला ‘बिहेविअरल इकॉनॉमिक्स’ म्हणजे ‘वर्तनात्मक अर्थशास्त्र’ म्हणतात. आजच्या लेखात आपण याच दृष्टिकोनातून बचतीकडे पाहणार आहोत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com