Income tax Return
Esakal
ॲड. सुकृत देव
प्राप्तिकर विवरणपत्र भरल्याने व्यावहारिक प्रमाणीकरण चांगले वाढते, त्यामुळे प्राप्तिकरदात्यास कर्ज घेणे सोपे जाते; सिबिल स्कोअर चांगला होतो/ राहतो. प्राप्तिकर विवरणपत्र पासपोर्ट/ व्हिसा यासाठीही उत्पन्नाचा एक चांगला पुरावा आहे. म्हणूनच प्राप्तिकर विवरणपत्र ही वैयक्तिक प्रमाणीकरणाची एक ओळख आहे, असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.
ज्या प्राप्तिकरदात्यांना ऑडिट करण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी आर्थिक वर्ष २०२४-२५चे (आकारणी वर्ष २०२५-२६) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलैची मुदत वाढवून १५ सप्टेंबर करण्यात आली आहे. तारीख जरी पुढे गेली असली, तरी आता त्या तारखेपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहेच. जेवढ्या लवकर प्राप्तिकर भराल आणि प्राप्तिकर विवरणपत्र दाखल कराल, तेवढे हिताचे आहे, नाहीतर लेट फी आणि व्याज जास्त भरावे लागेल. एकूण वार्षिक उत्पन्न जर पाच लाख रुपयांच्या खाली असेल, तर एक हजार रुपये भरावे लागतील. उत्पन्न त्याहून जास्त असेल, तर पाच हजार रुपये भरावे लागतील. प्राप्तिकर विवरणपत्र कोणी भरणे गरजेचे आहे? तर, ज्यांना विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे त्यांनी तर भरावेच; पण त्याशिवाय करपात्र उत्पन्न नसलेल्यांनीही भरावे, कारण तेच हिताचे ठरते.
प्राप्तिकरदात्यांनी निवड केलेल्या जुन्या किंवा नवीन करप्रणालीनुसार, वार्षिक करपात्र उत्पन्न जर स्लॅब रेटप्रमाणे जास्त असेल, तर विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५साठी (आकारणी वर्ष २०२५-२६) एकूण वार्षिक करपात्र उत्पन्न व प्राप्तिकराचे स्लॅब रेट खालीलप्रमाणे -