जनसंवाद (मास कम्युनिकेशन) क्षेत्रातील जाहिरात आणि जनसंपर्क या दोन क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम संधी मिळण्याचा सध्याचा काळ आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) या संस्थेने जनसंवाद, जाहिरात, मुद्रित पत्रकारिता, टीव्ही पत्रकारिता या विषयांतील दर्जेदार अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
या क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी आपल्या देशातील ही सर्वात महत्त्वाची प्रशिक्षण संस्था म्हणून आयआयएमसीने नाव कमावले आहे आणि गेल्या अनेक वर्षांत सर्वोच्च स्थान कायम राखले आहे. या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी उत्तमोत्तम करिअर संधी मिळतात.