फॅशन कॉर्नर । सोनिया उपासनी
दिवसेंदिवस जसा तापमानाचा पारा वाढतोय तसतशी अंगाची लाही लाही होते आहे. अजून किमान दोनेक महिने तरी आपल्या सर्वांना ही उन्हाची झळ सोसावीच लागणार आहे. सकाळी दहा वाजत नाहीत तोच गरम व्हायला सुरुवात होते आणि संध्याकाळी साधारण पाच-सहा वाजेपर्यंत उकाडा जाणवत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कुठल्याही प्रकारच्या कामांना लवकरच सुरुवात करणे श्रेयस्कर ठरते. भर दुपारी कुठे जाणे अनिवार्य असेल तरच जावे.