Premium|Terrace Gardening : गच्चीवरील बागेत फुलझाडांचे महत्त्व आणि विविध उपयोग

Best Flowering Plants for Terrace Gardens : गच्चीवरील बागेत फुलझाडे केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर परागीभवन, कीड नियंत्रण, औषधी उपयोग आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.
Terrace Gardening

Terrace Gardening

esakal

Updated on

डॉ. तृप्ती करेकट्टी / डॉ. दिलीप माळी

गच्चीवर जाई, जुई, मदनबाण, सायली अशा अनेक सुवासिक वेलवर्गीय फुलझाडांचे ताटवे लावता येतात. झेंडूसारखीच शेवंतीची रोपेही त्रासदायक कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. नास्टर्शियमप्रमाणेच सूर्यफूल, पेटुनिया, झिनिया ही फुलझाडेही मित्र कीटकांना आकर्षित करतात. या फुलझाडांमुळे आपली बाग अधिक आकर्षक, रंगीबेरंगी, सुवासिक आणि लाभदायक होते हे निश्‍चित.

मागील काही लेखांमधून आपण गच्चीवर भाजीपाला, फळझाडे, रानभाज्या, औषधी वनस्पती कशा लावायच्या हे पाहिले. पण फुलांशिवाय बाग ती काय? आपल्या टेरेसवर फुले तर हवीतच ना! फक्त शोभेसाठी आणि पूजेसाठी फुलझाडे लावण्यापेक्षा, ज्यांचा इतरही काही उपयोग होईल, अशी फुलझाडे लावण्याचा प्रयत्न करावा. फुलझाडांचे शेकडो प्रकार असले, तरी भाजीपाला, फळ उत्पादनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, किडीपासून इतर झाडांना वाचवणाऱ्या, परागीभवनास मदत करणाऱ्या, विविध पेये व गुलकंद करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या फुलझाडांचाही आपण विचार करावा. काही सुंगधी, काही औषधी आणि काही नैसर्गिकरित्याच कीडप्रतिबंधक फुलझाडे पाहू या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com