भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये मूलभूत संशोधनास चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाने भुवनेश्वर येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (नायसर) आणि मुंबई येथे सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स या संस्थांची स्थापना केली. मुंबई येथील संस्थेच्या स्थापनेसाठी मुंबई विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले.