अंतराळ विज्ञान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम चालवणारी व संशोधन कार्यास प्रोत्साहन देणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी ही आशिया खंडातील पहिली संस्था आहे. तिची स्थापना २००७मध्ये करण्यात आली. भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेसअंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे.
केरळ राज्यातील तिरुवनंतपुरमपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वालियामालास्थित या संस्थेत पदवी, इंटिग्रेटेड पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. असे अभ्यासक्रम करता येतात. या संस्थेत अंतराळ संशोधनाच्या संदर्भातील जागतिक दर्जाच्या संशोधनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.