

Monsoon Destinations Maharashtra
esakal
निकिता कातकाडे
पावसाळ्यात फिरायला कुठे जायचं हा एक ठरेलला प्रश्न असतो. अनेक ठिकाणी वीकएंडला बरीच गर्दी होते. अशा वेळी गर्दी नसलेली, पण मॉन्सून पर्यटनाचा आनंद देणारी ठिकाणं उत्तम पर्याय ठरतात. अशीच काही टॉप टेन हटके डेस्टिनेशन्स...
पहिला पाऊस पडला की मनात कुठेतरी भटकंतीची चाहूल लागते. मातीचा दरवळ, धुक्यानं झाकलेले डोंगर, हिरवाईनं नटलेल्या दऱ्या आणि खळाळत वाहणारे धबधबे... अशा वेळी कोणाला घरात बसून राहावंसं वाटेल? पण मॉन्सून ट्रिप म्हटलं की लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान किंवा इगतपुरी अशी ठरलेली नावंच आठवतात. यंदा मात्र जरा वेगळी वाट धरू या. गर्दीपासून दूर, निसर्गाशी निवांत संवाद साधता येईल आणि पावसाचा खरा आनंद अनुभवता येईल अशी महाराष्ट्रातली काही ऑफबीट ठिकाणं तुमच्या ‘मॉन्सून बकेट लिस्ट’मध्ये नक्की असायला हवीत. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, निसर्गाचा आदर करा, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा आणि स्वतःची तसंच आपल्या सोबतच्या प्रत्येकाची काळजी घ्या. कारण सुरक्षित प्रवासच प्रत्येक सहलीला अविस्मरणीय करतो. चला मग, बॅग भरायची तयारी करा आणि निघा या दहा हटके मॉन्सून डेस्टिनेशन्सच्या सफरीला.