भारतातील वस्त्रोद्योग सर्व प्रांतांत पसरलेला असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पारंपरिक वस्त्रनिर्मितीपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वस्त्रनिर्मितीपर्यंतचा प्रवास झपाट्याने झाला आहे.
या क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ टेक्स्टाइल ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणारी वस्त्रोद्योग क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास वाव देणारी आपल्या देशातील महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे.