आरजे शोनाली
रेडिओ जॉकी होणे म्हणजे केवळ माइकसमोर बोलणे नव्हे, तर ते श्रोत्यांच्या मनात घर करण्याचे एक कलात्मक काम आहे. तुमच्याकडे योग्य प्रशिक्षण, स्वतःची अशी खास शैली, उत्साही व्यक्तिमत्त्व आणि सातत्य असेल, तर तुम्हीही एक यशस्वी आरजे होऊ शकता!
रेडिओ हे एक असे माध्यम आहे, ज्याच्यावर फक्त ऐकू येते, दिसत नाही, पण तरीही ते थेट मनापर्यंत पोहोचते. गेली कित्येक दशके रेडिओने श्रोत्यांना माहिती देण्याबरोबरच त्यांचे मनोरंजनही केले आहे, एक भावनिक जिव्हाळा निर्माण केला आहे. आणि हा जिव्हाळा निर्माण करण्याचे काम करतो रेडिओ जॉकी अर्थात आरजे!