

Bhutan trip
esakal
‘कुझू झांगपोला’ म्हणजेच गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग आणि गुड नाइट. भूतानमध्ये याच उद्गारांनी स्वागत होते.
काही वर्षांपूर्वी आम्ही बँकेतील पाच निवृत्त सहकारी मित्रांनी भूतानची ट्रीप करण्याचे ठरविले. प्रथम विमानाने बागडोगरा येथे पोहोचलो. भूतान हा भारताबरोबरच चीन, तिबेट व नेपाळ यांचाही शेजारी आहे. या देशाचे क्षेत्रफळ साधारण आपल्या महाराष्ट्राएवढे असून, लोकसंख्या सुमारे दहा लाखापर्यंत आहे. बागडोगरा ते भूतान व्हाया जयगावला जाऊन भारताची हद्द ओलांडून भूतानमध्ये प्रवेश केला. जयगाव हे भारत-भूतानच्या सरहद्दीवर असलेले गाव. जयगावमधील स्वच्छता व भूतानमध्ये प्रवेश केल्यावर दिसलेली स्वच्छता यांत जमीन-अस्मानाचा फरक जाणवला.