
विनायक पटवर्धन
अलीकडे मी बऱ्याचदा पक्षी निरीक्षणासाठी जात असतो. मला हा छंद खूप उशिरा लागला, वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी! २०२०ची गोष्ट असेल. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातल्या झोळंबे गावी होतो. मी जिथं राहायचो त्या भागात आजूबाजूला होती उंचच उंच झाडी... किर्रर्र जंगलच... माझी बहीण, तिचा नवरा, भाची आणि जावईही त्यावेळी माझ्यासोबत होते. त्यांना प्राण्यापक्ष्यांची आवड आणि भरपूर माहितीही आहे. तेच माझे पहिले मार्गदर्शक ठरले.