Premium|Mohammed Shafi : कृष्णधवल मराठी चित्रपटांचा तो काळ; संगीताच्या मोहिनीमागे दडलेली महंमद शफींची विस्मृतीत गेलेली कहाणी

The Golden Era of Black and White Marathi Cinema : कृष्णधवल मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ, बदलते छायाचित्रण आणि मोहिनी घालणारे संगीत यामध्ये नौशाद यांचे सहकारी महंमद शफी यांच्या सतारवादनाचे योगदान मात्र काळाच्या ओघात विस्मृतीत गेले.
Mohammed Shafi

Mohammed Shafi

esakal

Updated on: 

सुलभा तेरणीकर

नवे चेहरे, नवे संगीतकार, नवे लेखक येत होते. रंगीत चित्रपटाची चाहूल लागली होती, नव्हे तो उंबरठ्यावरच येऊन ठेपला होता. अशा वेळी रजतपटावर छायाचित्रणातून छाया-प्रकाशाचा खेळ रंगात आला होता. मराठी चित्रपट कृष्णधवल होते. राजा परांजपे यांच्यासारखा कल्पक निर्माता-दिग्दर्शक मराठीत रहस्यपटाची निर्मिती करीत होता. विदेशी तंत्रासारखं छायाचित्रण दत्ता गोर्ले पाठलागमध्ये करीत होते... पण सिनेरसिकांवर संगीताचा मोहिनीमंत्र होता...

रंगीत हिंदी चित्रपटांचं स्वागत प्रेक्षकांनी केलं होतं, तरी मराठीत मात्र कृष्णधवल चित्रसृष्टी नांदत होती तेव्हाचा हा काळ. अनंत माने, माधव शिंदे, राजा परांजपे, मधुसूदन कालोलकर, भालजी पेंढारकर, दत्ता धर्माधिकारी मराठीचा गड राखून होते. तर, होमी वाडिया, होमी बिलिमोरिया, गुलाम हुसैन यांसारखे अमराठीही या क्षेत्रात उतरले होते. १९६४चा श्रीमान बाळासाहेब ही गुलाम हुसैन यांची निर्मिती लक्षवेधी ठरली. याचं संगीत नौशाद यांचं होतं आणि त्यांचे सहाय्यक महंमद शफी होते. लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलेलं ‘प्रीत रंगली ग कशी राजहंसी’ कुणाला आठवतही असेल. पण अत्यंत गुणी संगीतकार, संगीत नियोजनकार आणि सतारवादक महंमद शफी यांना मात्र लोक विसरले. संगीतकार नौशाद यांचे उजवे हात समजल्या जाणाऱ्या महंमद शफींच्या खाती स्वतंत्र कामगिरी अत्यल्प आहे. उस्ताद विलायत खाँ यांचे भाचे असणारे महंमद शफी उत्कृष्ट सतार वादक होते. गायक पंकज मलिक यांचं एक अप्रतिम गीत आहे, ‘ये रातें, ये मौसम ये हँसना हँसाना... मुझे भूल जाना इन्हे, ना भुलाना’. शफींची सतार या गाण्यात आपलं अस्तित्व टिकवून आहे, असं जाणवेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com