प्रसाद नामजोशी
डायमंड्स आर फॉरएव्हरमध्ये झळकलेल्या जिलच्या बुद्धिमत्तेविषयी तुम्ही काही ग्रह करून घेणार असाल, तर जरा थांबा. कारण जिल उच्च आयक्यू असणाऱ्या जगातल्या मोजक्या काही व्यक्तींपैकी एक आहे! वयाच्या पंधराव्या वर्षी तिचा आयक्यू १६२ होता. उच्च आयक्यू असणाऱ्या व्यक्तींच्या मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेची ती सदस्यही आहे.
डायमंड्स आर फॉरएव्हर ही इऑन फ्लेमिंगची गाजलेली कादंबरी. त्यावर इऑन फिल्म्सला त्याच नावाचा बॉन्डपट करायचा होता. खरंतर हा त्यांचा सातवा बॉन्डपट. त्यामुळे फार काही विचार करायचीही गरज नव्हती. पण कुठलाही बॉन्डपट करायला घेतला आणि तो सरळ मार्गाने पूर्ण झाला असं कधीच घडलेलं नाही.