Premium|Pune book lovers story : पुण्यातील वाचनवेडा प्रवास; आठ मिनिटांत ‘गरमागरम’ पुस्तकं, रद्दीपासून सोळंकी बुकसेलर्सपर्यंतची जादुई भेट

Bibliophilia and Book Collection Habits : झोमॅटोच्या वेगाने ८ मिनिटांत हातात पडणारे पुस्तक असो किंवा रद्दीच्या दुकानात अचानक गवसलेला खजिना; पुस्तकं केवळ कागद नसून ती वाचकांच्या आयुष्यात योग्य वेळी येणारी जिवंत पात्रे आहेत, हेच या लेखाचे सार आहे.
Pune book lovers story

Pune book lovers story

esakal

Updated on

गजानन आव्हाळे

कोणत्याही पुस्तकाबद्दल ऐकलं की ते ॲमेझॉनवरच्या लिस्टमध्ये ॲड करायची आता सवय लागलीये. पण त्यादिवशी काहीतरी वेगळंच घडलं. ॲमेझॉनवर त्या पुस्तकाखाली लिहून आलं, ‘८ मिनिट डिलिव्हरी’. डोळेच चमकले माझे! लगेच ऑर्डर करून टाकलं आणि आठ मिनिटांत ‘गरमागरम’ पुस्तक हातात! झोमॅटोवर बटर पनीरची ऑर्डर पडली की हॉटेलवाला कढईत तेल गरम करायला घेतो, तसा काही प्रकार इथं नव्हता, पुस्तक लिहून तयार होतं. पुस्तकासारखी जीवनावश्यक गोष्टही आठ मिनिटांत मिळायलाच हवी खरंतर! अशीच पुस्तकांची ऑर्डर रोज आली तर काय मजा येईल...

पुस्तकं निर्जीव असतात, तर मग त्यांना कसं कळतं एखाद्याच्या आयुष्यात कधी जायचं ते? खरंतर हा प्रश्नच खूप पोएटिक वगैरे आहे, पण पुस्तकं ज्या प्रकारे आयुष्यात येतात, ते बघून ती निर्जीव असावीत ह्याबद्दल शंका येणं सहाजिकच आहे. प्रत्येक पुस्तकामागे एक गोष्ट असते आणि असंख्य भावना असतात. ठरवून घेतलेली पुस्तकं आणि अचानक कुठूनतरी आयुष्यात आलेली पुस्तकं ह्यांत फरक असतो. कधीकधी एखादं पुस्तक वाचून वाटतं, की आपल्याला ह्याचीच तर गरज होती!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com