Premium|Brain Health : अब्जावधी लोक मेंदूच्या आजारांनी त्रस्त; मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी काय कराल?

Brain Disease Treatment : जगभरातील अब्जावधी लोक मेंदूच्या आजारांनी त्रस्त असताना उपचार आणि औषधांची उपलब्धता अजूनही असमान आहे. योग्य आहार, आरोग्यसेवा आणि तज्ज्ञ उपचारांद्वारे मेंदूचे आरोग्य जपणे आवश्यक आहे.
Brain Disease Treatment

Brain Disease Treatment

esakal

Updated on

भाग्यश्री फडके-धर्माधिकारी

आपण सहसा मेंदूच्या आजारांकडे कळत-नकळत दुर्लक्ष करतो. मेंदूचे आरोग्य वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जपले गेलेच पाहिजे. इतर अवयवांप्रमाणे आपल्या मेंदूलाही सक्रिय, सतर्क आणि निरोगी राखण्यासाठी योग्य पोषण आणि उपचारांची आवश्यकता असते. मेंदूच्या आरोग्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो.

गेल्या महिन्यात सर्वत्र जागतिक मेंदू दिवस साजरा केला गेला. या वेळच्या मेंदू दिनाची संकल्पना होती - ब्रेन हेल्थ : ॲक्सेस फॉर ऑल, अर्थात मेंदूच्या आरोग्यासाठी लागणारी अत्यावश्‍यक आरोग्यसुविधा सर्वांसाठी उपलब्ध असणे. विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती होऊन शास्त्रज्ञांनी मेंदूविषयी बरेच संशोधन केले आहे, तरीही जगभरातील अब्जावधी लोकांना अजूनही मेंदूसाठीची अत्यावश्यक औषधे सहज उपलब्ध होत नाहीत. जगभरात ३.४ अब्जाहून अधिक लोक मेंदूच्या आजारांनी त्रस्त आहेत. मेंदू व मज्जासंस्थेचे उपचार कित्येक देशांत, प्रदेशांत, समूहांमध्ये असमान पद्धतीने उपलब्ध आहेत, त्यामुळे अनेकांना मेंदूच्या आजारावरची महाग औषधे परवडत नाहीत. शिवाय अनेकदा प्रशिक्षित तज्ज्ञांचा अभाव असतो, डॉक्टरांना भेटण्यासाठी खूप वेळ थांबावे लागते, अनेकांना मेंदूचा आजार कलंक वाटतो आणि अनेक ठिकाणी अत्यंत मर्यादित प्रमाणात वैद्यकीय सेवा उपलब्ध असतात.

तसे बघायला गेले, तर भारतामध्येही मेंदू आणि मज्जातंतूंच्या आजारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दर एक हजार लोकांमागे १४ ते १७ लोकांना मेंदूचे गंभीर आजार आहेत. हे प्रमाण जागतिक प्रमाणाच्या (एक हजार लोकांमागे पाच ते आठ लोक) जवळपास दुप्पट आहे. आपल्या देशात पक्षाघात हा मृत्यू आणि अपंगत्वाला कारणीभूत ठरणारा मोठा आजार आहे. पक्षाघाताचे प्रमाणही वाढत आहे. आयसीएमआरच्या अहवालानुसार, वर्षाला १.२ दशलक्षहून अधिक नवीन पक्षाघाताचे रुग्ण आढळत आहेत. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ८.८ दशलक्षहून अधिक लोकांना स्मृतिभ्रंश आहे. हा आकडा २०५०पर्यंत ११.४ दशलक्ष होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच सुमारे ६० ते ८० लाख लोक अपस्माराने ग्रासलेले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com