
चर्चा। संतोष कुडले
काही दिवसांपूर्वी मुळशीमध्ये घडलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण अजूनही चर्चेत आहे. या भागाशी, त्या समाजाशी मी जन्मतःच जोडलो गेलो आहे. या प्रकरणामुळे त्या समाजाशी जोडलेल्या काही समस्या, तसंच काही निरीक्षणं समोर आणणं आवश्यक वाटलं. आपल्या नात्यागोत्यात, तुमच्या-माझ्यासारख्यांच्या घरात मुलगी जन्मताच तिच्या लग्नाविषयी चिंता सुरू न करता शैक्षणिक स्वप्नं बघायला शिकवायला हवं...