
दीपाली ठाकूर
डोळ्यांचं पारणं फिटावं, क्षणभर का होईना; पण सर्व दुःखांचा, ताणाचा विसर पडावा किंवा किमान मनातल्या मनात तरी ‘वाह!’ असा सहजोद्गार निघावा... असं काही तुमच्या बाबतीत घडलं, तर तुमच्यासमोर त्या क्षणी नितांतसुंदर असं काहीतरी असणार यात शंका नाही. आणि जर ही सौंदर्याची परिभाषा असेल, तर फुलपाखरू त्यात अगदी चपखल बसेल... केव्हाही... म्हणूनच,
पानोपानी फुले बहरती,
फुलपाखरे वर भिरभिरती...