
एकनाथ पवार
फुलांच्या वेलींवरून भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरं लहानांपासून थोरापंर्यत प्रत्येकाच्या कुतूहलाचा आणि आकर्षणाचा विषय असतात. फुलपाखरांवर अनेक कविता, गाणी लिहिली गेली. ‘छान किती दिसते फुलपाखरू’ ही कविता तर अनेक मुलांच्या ओठांवर असते. मात्र अशा सर्वांच्या लाडक्या फुलपाखरांनाही आता पर्यावर्णीय समस्यांचा फटका बसू लागला आहे. हे जाणून नाधवडे येथील सीमा संजय राणे यांनी फुलपाखरांच्या संवर्धनाचा संकल्प केला. आपल्या घरानजीक ‘शलभ’ नावाचं फुलपाखरांचं गावच वसवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांचा प्रवास समजून घेण्याचा हा प्रयत्न.