सागर गिरमे
आपल्याकडे शहरं बेसुमार वेगानं विस्तारत आहेत, मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीयांची संख्याही झपाट्यानं वाढतीये. अशातच कम्फर्ट जपत सध्या प्रतिष्ठेचं लक्षण मानली जाणारी कार घेण्याकडे बहुतांश जणांचा कल आहे. पण लोकं आता नुसतीच कार घेऊन थांबत नाहीत, तर तिचा लुक चेंज करणं आणि ती जास्तीत जास्त कस्टमाईज करण्याचा ट्रेंड सध्या रुजू पाहतोय.
कारचं व्हर्जन कोणतंही असो, ग्राहक त्यात आपल्या आवडीनुसार बदल करून घेणं पसंत करतात. त्यासाठी ॲक्सेसरीजचाही मुबलक वापर केला जातो. पण फक्त कार सजवणं किंवा ती सुंदर दिसणं एवढ्यापुरताच आता त्यांचा वापर उरलेला नाही. तर त्यापुढे जात सुरक्षेच्या दृष्टीनेही या ॲक्सेसरीज महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. स्टायलिश पण तितकीच सुरक्षितता वाढविणाऱ्या, आरामदायी आणि हायटेक ॲक्सेसरीज वापरताना एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे कायद्याचे नियम पाळणं. नाहीतर नक्कीच त्रास होऊ शकतो.