Heart Problem: जन्मजात हृदयरोग आणि त्यावरील उपचार

Heart care: शंभरातील एका बालकाला हा आजार असतो असे आढळून आले आहे. अलीकडील काळात बदलती जीवनशैली आणि पालकत्वास होणारा विलंब यामुळे अशा दोषासह जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण वाढत आहे.
heart Problem
heart ProblemEsakal
Updated on

डॉ. कार्तिक भोसले

जन्मजात हृदयरोग रोखण्यासाठी उपयुक्तता सिद्ध झालेले कोणतेही निश्चित असे उपचार अद्याप तरी नाहीत. परंतु गरोदरपणात काही पथ्ये पाळली तर हा रोग रोखण्यास मदत होते. शक्य तितक्या लवकर या रोगाचे निदान होण्यासाठी गरोदरपणात डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या वेळच्यावेळी करणे आवश्‍यक आहे.

जन्मजात हृदयरोग (कॉन्जेनिटल हार्ट डिसिजेस -सीएचडी) म्हणजे जन्मापासूनच हृदयाच्या संरचनेत असलेला दोष. जन्मजात आजार प्रकारांत सर्वसामान्यपणे दिसून येणारा हा आजार आहे.

शंभरातील एका बालकाला हा आजार असतो असे आढळून आले आहे. अलीकडील काळात बदलती जीवनशैली आणि पालकत्वास होणारा विलंब यामुळे अशा दोषासह जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण वाढत आहे.

जन्मजात हृदयविकाराची लक्षणे अनेकदा बाळाच्या जन्मापासूनच दिसून येत असली तरी अशी कोणतीही लक्षणे न जाणवणारे रुग्णही काहीवेळा दिसून आले आहेत. मात्र सर्वसामान्यपणे, या आजाराचे निदान झाल्यावर अथवा आजाराची लक्षणे निदर्शनास आल्यावर तत्काळ उपचार केले नाहीत, तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com