

Kerala Chakara Mud Bank
Sakal
चकाराची लोकप्रियता त्यातून मिळणाऱ्या मुबलक माशांमुळेच आहे. चकाराची बातमी येते, तेव्हा जवळच्या भागातील मच्छीमार त्यातून मिळणारे मासे गोळा करण्यासाठी धावतात. त्यांना घाई करावी लागते, कारण ही एक अल्पकाळ टिकणारी घटना आहे. अलीकडच्या काही वर्षांत हवामान बदल आणि इतर पर्यावरणीय घटकांमुळे तसेच पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे चकाराचा कालावधी आणि तीव्रता कमी झाली आहे.
‘चकारा’ (Chakara) किंवा ‘चिखलाचा किनारा’ (Mud bank) ही एक विलक्षण आश्चर्यकारक घटना केरळमध्ये दरवर्षी पाहायला मिळते. अल्पायुषी असलेला चकारा नैऋत्य माॅन्सून हंगामाच्या समाप्तीनंतर, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या सुमारास संपुष्टात येतो. ही घटना पूर्णपणे हंगामी आहे आणि ती केवळ माॅन्सूनमध्येच दिसून येते.