

Future of Chemical Engineering
esakal
डॉ. राहुल द. महाजन
संगणक अभियंता सॉफ्टवेअर तयार करतो, मेकॅनिकल अभियंता यंत्रे तयार करतो, सिव्हिल इंजिनिअर पायाभूत सुविधा उभारतो; परंतु केमिकल इंजिनिअर जगाला चालना देणारे इंधन, औषधे, अन्नप्रक्रिया, ऊर्जा, पाणी, पर्यावरण संरक्षण आणि औद्योगिक उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया निर्माण करतो.
एआयच्या युगातही सध्या या क्षेत्रातील करिअर सुरक्षित मानले जात आहे. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवत असली, तरी रिफायनरी, रासायनिक कारखाने, औषधनिर्माण संयंत्रे, ऊर्जा प्रकल्प, खत कारखाने यांचे प्रत्यक्ष संचालन, सुरक्षा, प्रक्रिया नियंत्रण आणि अभियांत्रिकी निर्णय पूर्णपणे एआयकडे सोपवणे नजीकच्या भविष्यात तरी शक्य होईल असे वाटत नाही. एआय हा केमिकल इंजिनिअरचा प्रतिस्पर्धी नसून साहाय्यक आहे. एआयमुळे उत्पादनक्षमता वाढेल, डिझाईन अधिक अचूक होईल, प्रक्रिया नियंत्रण सुधारेल आणि सुरक्षा वाढेल. पण अंतिम अभियांत्रिकी निर्णयासाठी प्रशिक्षित केमिकल इंजिनिअरची आवश्यकता कायम राहील. आधुनिक केमिकल इंजिनिअरने स्वतःला अद्ययावत ठेवणे तितकेच आवश्यक असते. ॲस्पेन प्लस, ॲस्पेन एचवायएसवायएस, कॅमकॅड, डीडब्ल्यूएसआयएम, ऑटोकॅड, सॉलिडवर्क्स, मॅटलॅब, पायथॉन, एएनएसवायएस फ्लुएंट, कॉमसॉल, पॉवर बीआय आणि एआयआधारित डेटा ॲनॅलिटिक्स यांसारखी सॉफ्टवेअर्स आत्मसात करणे आवश्यक आहे.
भविष्यात ग्रीन हायड्रोजन, सस्टेनेबल, एव्हिएशन फ्युएल, कार्बन कॅप्चर, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर केमिकल्स, विशेष रसायने, बायोफ्युएल्स, वेस्ट टू एनर्जी, सर्क्युलर इकोनॉमी आणि ॲडव्हान्स्ड मटेरियल्स या क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होतील असे आत्ताच्या परिस्थितीवरून वाटते.
संगणक अभियंता सॉफ्टवेअर तयार करतो, मेकॅनिकल इंजिनिअर यंत्रे तयार करतो, सिव्हिल इंजिनिअर पायाभूत सुविधा उभारतो; परंतु केमिकल अभियंता जगाला चालना देणारे इंधन, औषधे, अन्नप्रक्रिया, ऊर्जा, पाणी, पर्यावरण संरक्षण आणि औद्योगिक उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया निर्माण करतो. आजच्या आणि उद्याच्या भारताला लाखो कुशल केमिकल इंजिनिअर्सची आवश्यकता आहे. ज्यांना विज्ञानाची आवड आहे, उद्योग उभारण्याची महत्त्वाकांक्षा आहे, करिअरचा परीघ जागतिक स्तरापर्यंत न्यायचा आहे, समाजाच्या मूलभूत गरजांशी जोडलेले तंत्रज्ञान विकसित करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी केमिकल इंजिनिअरिंग ही केवळ एक शाखा नसून उज्ज्वल भविष्याकडे नेणारा राजमार्ग आहे.
लेफ्टनंट डॉ. राहुल द. महाजन कोल्हापूरस्थित डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिअरिंगमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.