डॉ. सुनील गोडबोले
लहान मुलांचा आहार हा आई-वडिलांसाठी कायमचा गोंधळाचा आणि आव्हानांचा विषय असतो. त्यात शिशू वयोगट आणि नोकरदार आई-वडील असे गणित असेल तर ते आणखीनच अवघड होते. आज हे गणित थोडे सोपे करायचा प्रयोग करूयात...
अन्न - आहार - पोषण - सवय
हल्ली आपण फक्त अन्न किती खाल्ले आणि गुगलवरच्या माहितीप्रमाणे त्यातून किती पोषणमूल्ये मिळाली याच आकडेवारीत अडकतो. वेगवेगळे अन्नपदार्थ, वयानुरूप योग्य त्या प्रमाणात मुलांना खायला देणे म्हणजे ‘चौरस आहार’! त्यातून मुलांना मिळणारी ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षार, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि पाणी या सगळ्याची योग्य मात्रा म्हणजे पोषण! आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सगळे स्वतःच्या हाताने, समाजमान्य पद्धतीने खाण्याची सवय लावणे म्हणजे संपूर्ण आहार. दुर्दैवाने आपण मुलांना फक्त भरविण्यात समाधान मानतो आणि त्यांना परावलंबी करतो.