
डॉ. सदानंद मोरे
मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गावर दखलपात्र विपरीत परिणाम होण्याची सुरुवात औद्योगिक क्रांतीनंतर अस्तित्वात आलेल्या वेगळ्या अर्थव्यवस्थेपासून अर्थातच भांडवलशाहीपासून झाली. या काळात यंत्रांनी चालणारे व पर्यावरणाला घातक ठरणारे उद्योगधंदे, कारखाने अस्तित्वात आले. इतकेच काय, तर वर उल्लेख केल्याप्रमाणे शेतीही याच पद्धतीने करायला हवी, असेही संबंधितांना वाटू लागले.
वर्तमानकाळात सतत ऐकू येणाऱ्या शब्दांपैकी एक महत्त्वाचा शब्द म्हणजे अर्थातच पर्यावरण (Environment). हा शब्द आता केवळ शब्दकोशातील अनेकांपैकी एक राहिला नसून त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे.