Premium|Climate Change Challenges : हवामान बदलाचे वाढते संकेत; तापमानवाढ, वितळणारा बर्फ, अनिश्चित पाऊस आणि मानवी आरोग्यावर घोंगावणारे संकट

Environmental sustainability and global warming : हवामान बदल हे केवळ पर्यावरणीय संकट नसून ते एक गंभीर सामाजिक आणि आर्थिक आव्हान आहे. वाढते तापमान, अनपेक्षित ऋतूचक्र आणि मानवी हस्तक्षेपामुळे बिघडणारे निसर्गाचे आरोग्य यावर तातडीने उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.
Climate Change Challenges

Climate Change Challenges

esakal

Updated on

प्रफुल पवार

हवामान बदल हा केवळ पर्यावरणीय प्रश्न नाही, तर ते एक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवरचे मोठे आव्हान आहे. या समस्येवर उपाय काढण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. व्यक्तिगत पातळीवर ऊर्जाबचत, पाणी संवर्धन, वृक्षारोपण आणि प्लॅस्टिकचा वापर कमी करणे यांसारख्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. शासनानेही नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देणे, पर्यावरणपूरक धोरणे राबवणे आणि जनजागृती वाढवणे आवश्यक आहे.

तुम्ही अनेकदा अनुभवले असेल, पूर्वी ऋतू ठरावीक वेळी यायचे. पावसाळा वेळेवर यायचा, थंडी ठरावीक प्रमाणात पडायची आणि उन्हाळाही सहन होण्यासारखा असायचा. परंतु आता चित्र बदलले आहे. कधी अचानक मुसळधार पाऊस, कधी तीव्र उष्णतेच्या लाटा, तर कधी अनपेक्षित थंडी असे बदल आपण वारंवार पाहत आहोत. हे नेमके का घडते, असा प्रश्न आपल्याला पडतो.

संयुक्त राष्ट्रांच्या मते, ‘हवामान बदल म्हणजे दीर्घकालीन कालावधीत तापमान आणि हवामानाच्या रचनेमध्ये होणारे बदल.’ पूर्वी हे बदल नैसर्गिक कारणांमुळे घडत होते, मात्र गेल्या काही दशकांत मानवी हस्तक्षेपामुळे या नैसर्गिक प्रक्रियेला अभूतपूर्व वेग मिळाला आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण, जंगलतोड आणि जीवाश्म इंधनांचा वाढता वापर यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि इतर हरितगृह वायूंचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. हे वायू पृथ्वीभोवती उष्णता अडकवून ठेवतात आणि त्यामुळे जागतिक तापमान वाढते. परिणामी, हवामानातील सूक्ष्म बदल आता स्पष्ट आणि धोकादायक स्वरूपात आपल्यासमोर दिसू लागले आहेत.

हवामान बदल हा एका दिवसात होणारा आणि जाणवणारा बदल नसतो. तो विविध संकेतांमधून म्हणजेच इंडिकेटर्समधून हळूहळू स्पष्ट होतो. एखाद्या आजाराची लक्षणे आपल्या शरीरात दिसतात, त्याचप्रमाणे विविध नैसर्गिक घटनांमधून आपल्याला पृथ्वीच्या ‘आरोग्या’तील बदलदेखील दिसतात. हे संकेत ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यावरच भविष्यातील उपाययोजना अवलंबून असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com