

Coffee for Healthy Skin
esakal
स्वप्ना साने
चमकदार, सॉफ्ट आणि सिल्की केसांसाठी महिन्यातून एकदा कॉफीचा हेअर मास्क लावता येऊ शकतो. ड्राय आणि फ्रीझी केसांसाठी हा खूप छान हेअर पॅक आहे. कॉफीचा उपयोग नॅचरल हेअर कलरिंगमध्येही करता येतो. याचा वापर नियमितपणे केल्याने केसांना नॅचरल ब्राउन कलर येतो.
कॉफी... हा शब्द उच्चारला तरी कॉफी लव्हर्सना कॉफीचा अरोमा हवेत दरवळल्याचा फील येतो. कॉफी लव्हर्स एक कप रिफ्रेशिंग कॉफी प्यायला कधीही तयार असतात. कॉफी प्यायल्यानंतर बॉडी एकदम चार्ज झाल्यासारखी वाटते. आपण जास्त ॲक्टिव्ह आणि रिफ्रेशिंग फील करतो. पण जर आपल्या त्वचेला कॉफीची ट्रीट मिळाली, तर आपली त्वचादेखील ॲक्टिव्ह आणि रिजुव्हनेट होते. कशी? ते पुढे पाहू या.