

Coffee Recipes Coffee Magic
esakal
वाढप - ८ ते १० तुकडे
साहित्य
दीडशे ग्रॅम डार्क चॉकलेट, अर्धा कप पीनट बटर, २ टीस्पून कॉफी पावडर, १ टेबलस्पून कोको पावडर, १ टेबलस्पून मध, २ टेबलस्पून बदाम.
कृती
सर्वप्रथम डार्क चॉकलेट वितळवून घ्यावे. त्यात पीनट बटर, कॉफी पावडर, कोको पावडर आणि मध घालून नीट एकजीव करावे. मग त्यात बारीक चिरलेले बदाम घालावेत. बटर पेपर लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण पसरवावे व दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवावे. फज घट्ट झाल्यानंतर त्याचे चौकोनी तुकडे करून सर्व्ह करावेत.
वाढप - २ ते ३ व्यक्तींसाठी
साहित्य
एक कप घट्ट दही किंवा ग्रीक योगर्ट, दीड टीस्पून कॉफी पावडर, १ टेबलस्पून कोको पावडर, २ टेबलस्पून मध, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स, १ टीस्पून चिया सीड्स, सजावटीसाठी डार्क चॉकलेट, गरजेनुसार पाणी.
कृती
कॉफी पावडरमध्ये एक टेबलस्पून गरम पाणी घालून कॉफी विरघळवून घ्यावी. दही, विरघळवलेली कॉफी पावडर, कोको पावडर, मध आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र फेटून घ्यावे. या फेटलेल्या मिश्रणात चिया सीड्स एकजीव कराव्यात. आता हे मिश्रण ग्लासमध्ये भरून दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवावे. मिश्रण सेट झाल्यानंतर त्यावर डार्क चॉकलेट किसावे. कॉफी योगर्ट मूस तयार.