

Healthy Maharashtrian Sweet Dishes
esakal
साहित्य
चार उकडलेली रताळी, १ वाटी साखर, १ वाटी आंब्याचा रस,
४ वाट्या दूध, २ चमचे तूप, आवडीनुसार बदाम आणि काजू.
कृती
सर्वप्रथम उकडलेली रताळी स्मॅश करून घ्यावीत. पातेल्यात तूप घेऊन त्यात बदाम आणि काजू जरासे परतून घ्यावेत. मग कुस्करलेली रताळी त्यात घालावीत. आता या मिश्रणात साखर घालावी व मिश्रण एकजीव करावे. नंतर दूध घालावे. सगळ्यात शेवटी आंब्याचा रस घालावा. हे मिश्रण उकळी येईपर्यंत चांगले शिजू द्यावे व भांड्याला चिकटू नये म्हणून ढवळत राहावे. रताळ्याची आम्रखीर तयार.