जयप्रकाश भालचंद्र झेंडे
डॉ. थॉमस मॅथ्यू यांनी लिहिलेले रतन नवल टाटा यांचे चरित्र वाचनीय आणि मनोरंजक आहे. रतन यांचे हे आतापर्यंतचे सर्वात अधिकृत आणि सर्वसमावेशक चरित्र आहे असे म्हटले जाते. हे पुस्तक लेखकाने परिश्रमपूर्वक गोळा केलेल्या प्रत्यक्ष माहितीचा खजिनाच आहे. रतन यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, समवयस्क, सहकारी यांच्या विस्तृत मुलाखती घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
टाटा कंपनीच्या शॉप फ्लोअरवर नवशिक्या म्हणून सुरुवात करून, रतन टाटा यांनी टाटा समूहाचा अध्यक्ष होऊन अनेक गंभीर आव्हानांवर मात करीत टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून भारताला जगासमोर नेले.