
डॉ. सुहास भास्कर जोशी
नजर पोहोचेल तिथपर्यंत आभाळाच्या निळाईत मिसळून जाणारं निळं निळं पाणी... क्रूझवरच्या अकराव्या मजल्यावरच्या डेकवर घोंगावणारा वाऱ्याचा आवाज... क्षितिजावर समुद्रात अलगद बुडत जाणारा सूर्याचा लाल-पिवळा गोळा... सगळं कसं शांत, निवांत... शहरापासून दूर... एकदम ‘सुशेगात’...!