अनिल सावळे
कोविड संकटाच्या काळात मोबाईलवर नंबर डायल केल्यानंतर डायलर ट्यून वाजायची, ‘कोविडच्या विळख्यातून वाचण्यासाठी वारंवार हात धुवा आणि मास्क घाला.’ आता आणखी एक संकट भेडसावत आहे ते म्हणजे सायबर फसवणुकीचे! आजही फोन केल्यावर एक डायलर ट्यून आपल्याला सायबर फसवणुकीपासून सावध करते. तरीही, दररोज हजारो लोक सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडून लाखो, कोट्यवधी रुपये गमावत आहेत.
सतत आणि सर्वत्र सावधानता बाळगणे हे सायबर गुन्हे कमी करण्याचे मुख्य सूत्र ठरत आहे.