
डॉ. राहुल हांडे
दादू दयाल यांच्या ‘दरीब्या’त जात-वर्ण-धर्म असल्या कोणत्याही भेदाला थारा नव्हता. सर्वत्र अद्वैताची सम्यक अनुभूती घेणाऱ्या दादूंना कोणत्याही गोष्टीत द्वैत दिसण्याची समस्याच उरली नव्हती. आपला कोणीही वैरी नाही अथवा आपले कोणाशी वैर नाही; कारण दुसरा कोणीच नसतो, सर्वत्र मीच आहे. सर्व एकाच ब्रह्मतत्त्वाचे अंग आहेत.
केते पारिख जौंहरी, पंडित ग्याता ध्यांन।
ज्यांण्यां जाइ न जांणियें, का कहि कथिये ग्यांन।।
झुठे अंधे गुर घणें, भरंम दिखावै आइ।
दादू साचा गुर मिलै, जीव ब्रहम है जाइ।।