दाणे खजूर लाडू आणि खजूर बर्फी!

हिवाळी पौष्टिक पदार्थ
Khajoor Ladoo
Khajoor LadooSakal

निर्मला देशपांडे

खजूर बर्फी

साहित्य

तिनशे ग्रॅम खजूर, २०० ग्रॅम सुके अंजीर, चमचाभर खरबूज

बिया, काजू तुकडे, भिजवून साल काढलेले बदाम, पिस्ते काप, भाजून साल काढलेले दाणे, वेलची पूड, भाजलेली खसखस, तूप.

कृती

खजूर ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून त्यातल्या बिया काढाव्यात व छोटे तुकडे करावेत. चमचाभर तुपात खजूर बिया मिक्सरमध्ये फिरवून घ्याव्यात.

सुके अंजीर गरम पाण्यात भिजत ठेवावे. धुऊन छोटे तुकडे करावेत. गॅसवर कढई तापवून मंद आचेवर खरबुजाच्या बिया भाजून घ्याव्यात. कढईत चमचाभर तूप घालून त्यात भिजलेल्या अंजिराचे तुकडे घालून परतावे व मॅश करावेत.

आणखी थोडे तूप घालून भाजावे. मग त्यात सगळ्या सुकामेव्याचे तुकडे घालावेत. दाणे घालावेत. मिक्सरमध्ये फिरवलेला खजूर घालावा.

वेलची पूड, थोडी खसखस घालावी. सगळे चांगले मिक्स करून घ्यावे. थाळ्याला तूप लावून त्यामध्ये मिश्रण थापावे. वरून पिस्त्याचे काप लावून सजवावे व वड्या कापाव्यात.

Khajoor Ladoo
Jaggery In Winters: हिवाळ्यात गूळ खाणे खूप फायदेशीर, या आजारांपासून मिळेल सुटका

दाणे खजूर लाडू

साहित्य

वाटीभर भाजून साल काढलेले शेंगदाणे, पाऊण वाटी खजूर, तूप, वेलची पूड.

कृती

खजूर धुऊन पुसून कोरडा करून बारीक चिरावा. कढईत अर्धा चमचा तुपावर खजूर भाजून घ्यावा. दाण्याचे बारीक कूट करावे.

मिक्सरच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात खजूर फिरवून घ्यावा. त्यात दाण्याचे कूट घालून परत फिरवावे व मिश्रण थाळीत काढावे. त्यात वेलची पूड मिसळावी व लाडू वळावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com