Premium|Film Making Journey : पत्रातून पडद्यावर उतरलेलं प्रेम; ‘डिअर फ्लेमिंगो’चा प्रवास

short film making : पहिल्यांदाच शॉर्ट फिल्म करताना गजानन आव्हाळेंनी पत्ररूप कथन, साधं दृश्य आणि प्रभावी साउंड डिझाइन वापरून ‘डिअर फ्लेमिंगो’ ही प्रामाणिक फिल्म साकारली.
Film Making Journey

Film Making Journey

sakal

Updated on

गजानन आव्हाळे

पहिल्यांदाच फिल्म करत होतो, बरेच प्रश्न होते डोक्यात. माझ्याकडे कॅमेरा नाहीय, फोननं शूट करणं जमेल का? एडिटिंगचं कसं करायचं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता साउंड डिझायनिंगचा. मला तेव्हाही वाटलेला आणि अजूनही किचकट वाटणारा भाग म्हणजे साउंड डिझाईन. पण त्याला अजून बराच वेळ होता. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता, पत्रात काय लिहायचं आणि कुणाला लिहायचं...?

अक्षय इंडीकर सरांच्या सिनेमा लॅब या फिल्ममेकिंग वर्कशॉपमध्ये असाइनमेंट म्हणून फिल्म तयार करायची होती. या वर्कशॉपमध्ये प्रत्येकालाच एक फिल्म तयार करावी लागते ह्याची आधीच कल्पना असल्यामुळे एक स्क्रिप्ट डोक्यात तयार होती आणि त्यावरच एक शॉर्ट फिल्म करण्याचा विचार होता. वाटलं, आता फक्त व्हिडिओ शूट करायचा आणि एडिटिंग केलं की फिल्म रेडी! पण तिथंच विषय पलटला. आम्हाला फिल्म कशी करायची आणि त्यातून काय अपेक्षित आहे ह्याबाबतीत सूचना मिळाल्या. कुणालाही, कशालाही, कोणत्याही भाषेत पत्र लिहायचं, तीच तुमची स्क्रिप्ट. ते पत्र स्वतःच्याच आवाजात रेकॉर्ड करायचं, आवाजात फार चढ-उतार न ठेवता; आणि मग नंतर व्हिडिओ शूट करायचा. या सगळ्या सूचना मिळाल्या वर्कशॉपच्या तिसऱ्या दिवशी. त्यामुळे माझी आधीची फिल्म डोक्यातल्या डोक्यात गुंडाळावी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com