
सारंग खानापूरकर
हरित हायड्रोजन हा केवळ ऊर्जेसाठीचा एक पर्याय नसून, भावी पिढीच्या ‘स्वच्छ’ भविष्यासाठीची आणि कार्बनमुक्त पर्यावरणासाठीची एक गरज आहे. तापमानवाढ रोखणे अवघड ठरत आहे. आतापर्यंतची सर्वाधिक उष्णतेची वर्षे म्हणून मागील काही वर्षांची नोंद झाली आहे. या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाने हरित हायड्रोजनसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.