

Machine Learning History
esakal
डॉ. अनघा केसकर
एआय विकासामध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या तज्ज्ञ प्रणालींच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर संशोधकांनी एक मूलभूत प्रश्न स्वतःला विचारला - यंत्राला आपण सगळी उत्तरं नियमांच्या रूपातच सांगायची का? की त्याला उदाहरणांमधून स्वतः शिकता येईल? यातूनच मशिन लर्निंगच्या दिशेनं विचार सुरू झाला. याचं श्रेय प्रामुख्यानं टॉम मिशेल यांना दिलं जातं. या प्रणालीसाठी प्राथमिक संशोधन १९५० ते १९८० या दशकात झालं होतं. त्यामध्ये प्रयोग मात्र १९९० ते २००० दरम्यान सुरू झाले.