
राकेश कुल्चावाला
थंडीचे दिवस सुरू झाले की तमाम जनतेला हिमालयाच्या सावलीतल्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे वेध लागतात. त्यासाठी दिल्लीहूनच जावं लागतं. ही बरीचशी ठिकाणं दिल्लीहून चार ते दहा तासांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे दिल्लीत राहायची वेळ आली, तर आमच्यासारख्या दिल्लीकरांना हक्काची हाक दिली जाते.
‘आम्ही दिल्लीहून जाणार आहोत, एक दिवस थांबू का?’ असं विचारलं जातं. मग दिल्लीदर्शन घडवण्याची जबाबदारी दिल्लीकरांवर येते.
दिल्लीहून निघताना लटक्या आवाजात, ‘तुम्हीपण आला असतात तर बरं वाटलं असतं’ असं म्हणतात. मुळात त्यांचा हा प्लॅन आधीपासून झाला आहे हे दिल्लीकरांना माहिती असतं. आपण त्यांना तिथं नकोय हे त्याहून माहिती असतं. त्यामुळे दिल्लीकर फक्त हसून हो म्हणतात.