Premium|Nifty 2026 outlook : मंदीच्या वातावरणात तेजीची लहर की पुन्हा एकदा पडझड? जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांची पुढची चाल काय असावी?

Geopolitical impact on Indian share market : अमेरिका-इराण शांतता चर्चेतील अडथळ्यांमुळे शेअर बाजारातील तेजीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. निफ्टीने २४००० चा टप्पा ओलांडला असला, तरी जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये आता 'पुढे काय?' हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Geopolitical impact on Indian share market

Geopolitical impact on Indian share market

esakal

Updated on

भूषण महाजन

अमेरिकेने कितीही वल्गना केल्या, तरी तेथील व्याजदर अध्यक्षांचा शर्ट खेचत युद्धज्वर कमी करतील. जरी वर्षभर तेलाचे भाव चढे राहिले, तरी चार ते पाच टक्के महागाई दर आपण सहन करू शकू. रुपया सावकाश मजबूत होत आहे.

कुठल्याही युद्धात सहसा विजयी राष्ट्र तहाच्या अटी ठरवत असते, उदाहरणार्थ, पहिले व दुसरे महायुद्ध. सध्या सुरू असलेल्या संघर्षात ट्रम्प यांनी सतत ‘मी जिंकलो, मीच जिंकलो’, अशा डरकाळ्या फोडल्या असल्या, तरी इराण ते मान्य करायला तयार नाही. अमेरिकेच्या अटींवर वरताण अशा अटी इराणने घातल्या आहेत. साहजिकच शांततेच्या वाटाघाटी कितपत यशस्वी होतात ही शंकाच होती. पाकिस्तानमध्ये ४७ वर्षानंतर अमेरिकेचे

जे.डी. व्हान्स, इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाघेर व परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास समोरासमोर युद्धविरामाची व पुढील तहाची बोलणी करायला आले आणि तब्बल २१ तास चर्चा झाली.

ता. १८ एप्रिल २०२६च्या आमच्या लेखात (जिंकू किंवा मरू) तेजीचे रसायन तयार आहे आणि आजच्या मंदीच्या वातावरणात एखादी तेजीची लहर येईल असे वाटते, असे भाकीत वर्तवले होते. २१८०० ते २२००० असे बाजाराचे टार्गेट असले, तरी गुरुवारी २ एप्रिलला नोंदविलेला २२१८२चा तळ महत्त्वाचा वाटतो, असेही आम्ही म्हटले होते. त्याबरहुकूम, नेमका मागचा संपूर्ण आठवडा तेजीचा ठरला. २२७३१ अंशावरून पुढे चाल घेत निफ्टीने २४००० अंशाचा अडथळा पार केला व सप्ताहाचा बंद २४०५० असा दिला. आता सर्व पंटर्स तेजीची गोड स्वप्ने रंगवत अमेरिका-इराणच्या तहाच्या निष्कर्षाची वाट पाहत होते. नेमका रसभंग झाला आणि बोलणी फिसकटली अशी बातमी बाहेर आली. आता पुढे काय?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com