Premium|Warkari tradition legacy : दहा पिढ्यांची अखंड सेवा; वासकर घराण्याचा वारकरी परंपरेतील प्रेरणादायी वारसा

Warkari Sampraday : वारकरी संप्रदायातील वासकर घराण्याने दहा पिढ्यांपासून पांडुरंग, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांच्या सेवेत अखंड भक्तीपरंपरा जपत गुरू-शिष्य परंपरेचा प्रेरणादायी वारसा पुढे नेला आहे.
Warkari tradition legacy

Warkari tradition legacy

esakal

Updated on

देवव्रत महाराज वासकर

वारकरी संप्रदायात ‘माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा’ हा केवळ अभंग नसून, तो आयुष्याचा ध्यास आहे. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली सेवा, गुरू-शिष्य परंपरेतून वाढलेली भक्ती आणि पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेली निष्ठा यांचे हे सुंदर चित्र आहे. वासकर घराण्याची ही परंपरा आजही तेवढ्याच तेजाने पुढे चालू आहे.

वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक प्रवाह नाही, तर ती जीवन जगण्याची साधी, सरळ आणि भक्तिमय पद्धत आहे. ‘माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा’ या अभंगातून प्रत्येक वारकरी आपल्या सेवेला परंपरेचा वारसा मानतो. ही सेवा कुणाच्या मालकीची नसते, तर ती संतांची देणगी असते. त्यामुळेच प्रत्येक पिढीला पांडुरंगाच्या सेवेत स्वतःला अर्पण करण्याचे भाग्य लाभते.

अकरावी पिढी

वासकर घराण्याची परंपरा अशाच भक्तिभावातून रुजलेली आहे. आज दहावी पिढी पांडुरंगाच्या सेवेत कार्यरत आहे आणि अकरावी पिढीही ज्ञानोबारायांच्या सेवेत रुजू झाली आहे. म्हणजेच दहा पिढ्यांपासून पांडुरंगाची आणि ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची सेवा अखंडपणे सुरू आहे. ही परंपरा केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर श्रद्धेच्या बळावर टिकून आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com