
नेहा लिमये
आपल्या संगीताचा मूळ पाया समजल्या जाणाऱ्या धृपद शैलीचा वापर चित्रपट संगीतात किंवा भाव संगीतात का नाही, असा एक प्रश्न मनात येऊ शकतो. त्याचं सरळ उत्तर असं आहे, की चित्रपटसंगीत हे मुख्यतः लोकप्रिय आणि सोपं असावं लागतं. त्याला धृपदाची गहन आणि ध्यानात्मक बैठक फारशी मानवणारी नाही. पण त्याचंच विस्तारीत, वेगळं रूप म्हणजे ख्यालगायकी.