Premium|Diabetes: मधुमेह सायलेंट किलर की जीवनशैलीचा परिणाम?

Health Awareness: मधुमेह हा सायलेंट किलर कसा आहे, त्याची कारणे, लक्षणे, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि केवळ गोळ्यांवर अवलंबून राहण्याचे धोके स्पष्ट करणारा सखोल लेख.
Diabetes

Diabetes

esakal

Updated on

डॉ. सुबोध देशमुख

मधुमेहाचे निदान झाले की बहुतेकांचा पहिला प्रश्न असतो, ‘डॉक्टर, कोणती गोळी घेऊ?’ आपल्याला वाटते गोळी घेतली की साखर नियंत्रणात येईल आणि आपण मुक्त होऊ. पण हे अर्धसत्य आहे. मधुमेहाची गोळी घेणे म्हणजे घरातील कचरा उचलून बाहेर टाकण्याऐवजी तो सोफ्याखाली किंवा कोपऱ्यात झाडून ठेवण्यासारखे आहे. कचरा नजरेआड होतो खरा, पण तो घरातून (शरीरातून) बाहेर गेलेला नसतो.

आजच्या धावपळीच्या युगात आपण प्रगतीच्या शिखरावर पोहोचलो आहोत, पण या प्रवासात आपण आपले आरोग्य मागे सोडत चाललो आहोत. भारताला सध्या जगाचे ‘डायबेटिस कॅपिटल’ (मधुमेहाची राजधानी) म्हटले जाते, ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब आहे. घराघरांत पोहोचलेला हा आजार नेमका आहे तरी काय आणि तो इतक्या वेगाने का पसरतोय, हे समजून घेणे काळाची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com