Premium|Diwali Faral Traditions : चकली, चिवडा, लाडू सारेच गप्प; दिवाळीच्या फराळात यंदा वेगळंच वातावरण का?

Diwali Faral and Kitchen Secrets : दिवाळी जवळ आली, फराळाचे पदार्थ तयार झाले; पण यंदा फडताळात नेहमीसारखी लगबग नव्हती. चकली, चिवडा, लाडू आणि करंज्यांमध्ये पसरलेली शांतता नेमकं काय सांगत होती?
Premium|Diwali Faral Traditions : चकली, चिवडा, लाडू सारेच गप्प; दिवाळीच्या फराळात यंदा वेगळंच वातावरण का?
Updated on: 

मंगेश साखरदांडे

दिवाळी अजून उंबऱ्यावरही नव्हती, फराळाचे घाणे तर पडले होते, पण नेहमीसारखे डबेच्या डबे भरत नव्हते. कारभार जरा मोजकाच दिसत होता. वातावरण नेहमीपेक्षा वेगळं वाटत होतं. भरीसभर म्हणून दिवाळीच्या फराळ-मंडळातल्या बऱ्याचशा मेंबरांचा अजून पत्ताच नव्हता. एरवी साजूक तुपात घोळलेल्या लाडवाच्या भाऊबंदांचा अजून पत्ताच नव्हता.

ना ही म्हटलं तरी फडताळात तीन-चार दिवस जरा सामसूमच होती. पेपरमधल्या बातम्यांमध्ये काही काही वेळा उल्लेख असतो ना, तशी म्हणजे अगदी तणावपूर्ण शांतता...! दुपारी-रात्री स्वयंपाकघर शांत झालं, की दिवाळी फराळाचे मानकरी चकल्या, चिवडे, कडबोळी, करंज्या,

शंकरपाळे झालंच तर अनारसे आणि चिरोटेही तसे रोज भेटायचे; पण विषय कसा काढायचा आणि मुख्य म्हणजे कोणी काढायचा हे कोणालाच कळत नव्हतं आणि काय चाललंय तेही कळत नव्हतं. एरवी फडताळातल्या फराळ-सभांत अंगावरचे काटे कोणाला टोचतील याची तमा न बाळगता गरागरा फिरणारी चकली आणि जरा ‘हाच’ असणारा नाजूकसा चिरोटा आपल्या वाटेत आला तर त्याचं काय होईल, याची काळजी न करता आपलेआपलेच निवांत गडगडणारे लाडवांचे भाऊबंद सगळेच अंग चोरून होते. चिवडे आणि कडबोळी तर कम्प्लिट गांगरून गेले होते.

काळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!
आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com