Premium|Traditional Diwali Faral Recipes : दिवाळीचा फराळ म्हणजे केवळ पदार्थ नव्हे, नात्यांमधला गोडवा जपणारी परंपरा

Diwali Snacks and Traditional Flavours : चिवडा, चकली, करंजी, लाडू, शंकरपाळी अशा पारंपरिक फराळाच्या पदार्थांशिवाय दिवाळी अपूर्णच! घराघरांत फराळाची तयारी, पदार्थांची चव आणि आपुलकीची देवाणघेवाण सणाचा आनंद द्विगुणित करते.
Diwali Snacks and Traditional Flavours

Diwali Snacks and Traditional Flavours

esakal

Updated on: 

स्नेहल बाकरे

पूर्वी दिवाळीचा फराळ वर्षातून एकदाच केला जायचा. त्यामुळे दिवाळी जवळ आली, की फराळ करणारे आणि तो चवीनं खाणारे असे सगळेच अगदी आतुरतेनं फराळाची वाट पाहायचे. घरोघरी फराळासाठी लागणारं सामान भरण्यापासून ते एकमेकांना फराळाचे डबे पाठवण्यापर्यंत सगळ्यांचीच लगबग असायची...

सोनू... तुला माझ्यावर भरवसा नाय काय?

बुंदीचा आकार कसा गोल गोल

लाडूची चव कशी गोड गोड

करंजीची पारी कशी खोल खोल

आता तरी... सोनू तू माझ्याशी गोड बोल...

दिवाळीच्या फराळाच्या भरलेल्या ताटाकडे पाहिलं, की सोनूच काय, ओळखीचे, अनोळखी सगळेजण गोड बोलतील. चटपटीत चिवडा, खुसखुशीत शंकरपाळी, कुरकुरीत चकली, नाजूकशी मुरड घातलेली करंजी, खमंग अनारसे, साजूक तुपातले मऊसर बेसनाचे लाडू, पाकात मुरलेली बुंदी... या सगळ्या पदार्थांच्या चवीची मजा काही औरच. रंगीबेरंगी आकाशकंदील, अंगण उजळवून टाकणाऱ्या पणत्या, नवीन कपडे, फटाके, जागोजागी असणारी रोषणाई हे सगळं जरी असलं, तरी जोपर्यंत फराळाचा स्वाद जिभेवर रेंगाळत नाही, तोपर्यंत दिवाळीची खरी रंगत चढत नाही. दिवाळीत फराळ हवाच... अहो शास्त्र असतं ते!

अकराव्या शतकात रघुनाथसुरी यांनी लिहिलेल्या भोजनकुतूहल या ग्रंथातही खास दिवाळीत केल्या जाणाऱ्या फराळाबद्दलचं आहारशास्त्र वाचायला मिळतं. त्यानुसार ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात म्हणजे शरद ऋतूच्या काळात घरात पीक आणायला सुरुवात होते आणि वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला थोडीफार उसंत मिळते. मग अशा वेळी घरात गोडधोड पदार्थ केले जातात. तसंच या ऋतूत थंडीमुळे आपली त्वचा रूक्ष व्हायला सुरुवात होते. तेव्हा तेलातुपापासून तयार केलेल्या फराळामुळे त्वचेतील स्निग्धता टिकून राहायला मदत होते. म्हणजेच दिवाळीत केला जाणारा फराळ हा खरंतर आपली संस्कृती व आरोग्य यांचा समतोल राखण्यासाठी केला जातो.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!
आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com